
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
गावाकडे ऑटो नी परत जात असलेली पंधरा वर्षीय बालिका साक्षी संतोष कुळसंगे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. साक्षी आपल्या गावातील शेजारी सह दिवाळीची खरेदी करण्याकरता राळेगाव येथे आली होती सायंकाळी खरेदी आटपून ऑटो क्रमांक एम एच २९ व्ही. ८८२४ ने निधा गावाकडे परत जात असताना समोरून येणाऱ्या खाचराला धडक लागल्याने ऑटो उलटला यात साक्षी चा मृत्यू झाला.
हा अपघात राळेगाव सावंगी मार्गावर झाला. ऑटो त तीन प्रवासी बसले होते खाचराची लोखंडी आर ऑटो लागल्याने ऑटो उलटला असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले मृतक बालिका ही आपल्या आजोबाकडे निधा येथे राहत होती. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील करीत आहे.
