दर चार दिवसा आड राळेगांव करांना पिण्याचे शुध्द पाणी नियमित वितरित करु शैलेश काळे प्रशासक तथा एस.डी.ओ.

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225)

सध्या अनेक नानाविधकारणांमुळे राळेगांव शहरवासीयांना आठ ते दहा दिवसा आड पिण्याचे पाणी मिळत आहे. पण आता ४६ वर्ष पुरातन जलकूंभ तंदुरुस्त झाला,सोबत च जलशुध्दीकरण केंद्रा मधील सर्व गाळ बाहेर काढून,संपूर्ण साफसफाई केल्याचे राळेगांव वासियांना पुढील पंधरा दिवसां पासून दर चार दिवसा आड पिण्याचे स्वच्छ,शुध्द,पाणी नियमित वितरित करण्याचा संकल्प राळेगांव नगर पंचायत चे प्रशासक तथा उपविभागीय महसूल अधिकारी शैलेश काळे यांनी केल्याचे दैनिक देशोन्नती शी बोलताना सांगितले आहे.
जलशुध्दीकरण केंद्राची पाच ते सहा वर्षापासून काहीच साफसफाई केली नव्हती. त्यामुळे यातून सात फूट साचलेला गाळ काढण्यात आला. यासाठी मागील वेळी जो अवाढव्य खर्च संबंधितांनी केला.त्या पेक्षा खूप कमी म्हणजे सरसकट पंचवीस हजार रुपयात संपूर्ण जलशुध्दीकरण केंद्राची साफसफाई केल्याने,शुध्द पाणी पुरवठा सुरु झाला आहे. आता सध्या दोन जलकूंभ कार्यान्वित आहे.त्यामुळे प्रत्येक प्रभागाला पिण्याचे पाणी मिळण्यासाठी विलंब होत आहे. पण आता तिसरा जलकूंभ तंदुरुस्त झाला असून,अवघ्या पंधरा दिवसांत चार दिवसा आड पिण्याचे पाणी देऊ असे सांगून,लोकसहभागातून शववाहिनी सेवेत येईल. सोबत च स्मशानभूमीत नवीन दहन शेड,यासह सर्व सोयी सुविधा आपल्या प्रशासक कार्यकाळात देऊ असे एस.डी.ओ.शैलेश काळे यांनी सांगितले आहे. यावेळी सी.ओ अरुण मोकळं,पाणी पुरवठा अभियंता ज्ञानेश्वर घरडे,सागर राऊत सह गोपाळ ढेकणे उपस्थित होते.