राष्ट्रीय लोक अदालत मधून मोडलेले संसार पूर्ववत,320 विविध प्रकरणाचा निपटारा..

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण न्यायालय राळेगाव व वकील संघ राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोक अदालत मधून सहा मोडलेल्या संसाराचा वाद मिटून पूर्ववत संसार मांडण्यास सुरुवात केली राष्ट्रीय लोक अदालत लोक अदालत फिरते लोक आदालत हे आपसी समझोता मधून प्रकरण मागे घेण्याचे उत्तम उपक्रम होय न्यायालयीन प्रक्रियेतून अनेक संसार न्यायाच्या प्रतीक्षेत असतात परंतु लोक न्यायालया मधून अशा प्रकरणातून दोन्ही पक्षकार माघार घेत असेल तर कुठलाही शुल्क न आकारता हे प्रकरण न्यायालयात निपटारा करता येतो राळेगाव येथे न्यायालयात संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोक अदालत मधून न्यायप्रविष्ट असलेले सहा संसार एकत्र आली असून पती-पत्नींनी आम्हाला पूर्ववत एकत्र सुखाने संसार करायचा आहे अशा आशयाचे समझोता करून सुखाने नांदण्यास न्यायालयातून हसत हसत बाहेर पडले यावेळी पॅनल सदस्यांनी त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या================राष्ट्रीयलोक न्यायालयात बँक प्रकरने. ग्रामपंचायत च्या कराचीप्रकरणे. वैवाहिक वाद .थकबाकी. जागेचे वाद. इतर साधी प्रकरणे अशा प्रकारची 320 प्रकरणाचा निपटारा याप्रसंगी करण्यात आला राष्ट्रीय लोक अदालत चे उद्घाटन न्यायमूर्ती विजय जटाळ. न्यायमूर्ती भूषण नेरलीकर यांनी केले यावेळी गटविकास अधिकारी शामकांत पवार पोलीस निरीक्षक प्रकाश तुकलवार पॅनल सदस्य प्रा अशोक पिंपरे ऍड रितेश वर्मा ऍड रोशनी वानोडे यांची उपस्थिती होती राष्ट्रीय लोक अदालत यशस्विते करिता अधीक्षक राजेश भास्कर वार . सतीश देशपांडे. अमोल अडस्कर. प्रियंका तिडके ,विशाल डा फ.daf शशिकांत ढाले. तुषार बागडे. नितीन पुसदकर अरुण पारधी कुंदन दास मेश्राम. किरण थोटे परविन सय्यद यांनी परिश्रम घेतले