
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
औरंगाबाद येथील महिला सरपंच परिषदेत मा आमदार संजय शिरसाठ यांनी ग्रामसेवक संवर्गाबद्दलच्या केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल आज दिं ९ नोव्हेंबर २०२१ रोज मंगळवारला राळेगांव तालुक्यातील सर्व ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांनी फिती लावून व जाहीर निषेध नोंदवून एक दिवसीय कामबंद आंदोलन केले असून आमदार शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनातुन करण्यात आले आहे.
औरंगाबाद येथे दिं ८ नोव्हेंबर रोजी महिला सरपंच परिषद घेण्यात आली होती या परिषदेमध्ये आमदार संजय शिरसाठ यांनी ग्रामसेवक संवर्गाबद्दल अपमानास्पद शब्द वापरून अवमान केला आहे वास्तविक पाहता राज्यातील ग्रामसेवक संवर्ग हा शासन व्यवस्थेमध्ये गावपातळीवर काम करणारा शेवटचा घटक असून सदर काम करतांना जनमाणसांशी संपर्क व समनव्यय ठेवून अत्यंत कसोटी व पारदर्शक पद्धतीने असंख्य अडीअडचणीवर मात करून केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकास योजना राबविणारा घटक आहे . असे असतांना सुद्धा सन्माननीय आमदार महोदयांनी या बाबी विचारात न घेता बेताल वक्तव्य करून ग्रामसेवक संवर्गाची प्रतिमा जनमानसात मलीन केली आहे . तसेच भविष्यात सरपंच व ग्रामसेवक यांच्यामध्ये या चितावनीखोर वक्तव्यामुळे तेढ निर्माण होईल असा हेतू दिसून येतो . त्यामुळे आमदार श्री संजय शिरसाट यांच्यावर भा.द.वि. १८६० चे कलम १०७,२२८ , २८८,२ ९ ४,३५३,४ ९९ , ५०४ , या कलमानुसार फौजदारी गुन्हा नोंद व्हावी अशी मागणी आहे ग्रामसेवक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
