
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
शौर्य आणि पराक्रमाची राणी दुर्गावती यांची ४९७ वी जयंती दिं ५ ऑक्टोबर २०२१ रोज मंगळवारला वाऱ्हा येथे साजरी करण्यात आली. राणी दुर्गावती जयंती निमित्य कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळकृष्ण गेडाम बोलतांना म्हणाले की दिवसेंदिवस आदिवासी समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय-अत्याचार होत असून आदिवासी समाजाच्या नावावर मोठमोठ्या नोकऱ्या सुद्धा बळकावलेल्या आहेत.त्यासाठी गोंड परधान कोलाम आदी समाजाने एकत्रित येऊन या होणाऱ्या अन्याय विरुद्ध आपण लढा दिला पाहिजे कारण आदिवासी समाज हा परिवर्तनाच्या मार्गावर आलेला आहे आदिवासी समाजामध्ये परिवर्तनाची ऊर्मी असून समाजात विचार परिवर्तन करणे काळाची गरज आहे असे मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक बळवंत मडावी यांनी आदिवासी समाजाने राजकीय दबाव निर्माण केला पाहिजे असे वक्तव्य यावेळी केले तसेच प्रमुख अतिथी म्हणून दिलीपजी शेडमाके यांनी पुढे होणाऱ्या जनगणनेतील धार्मिक कॉलममध्ये आदिवासींनी गोंडीधर्म लिहावा असा संदेश आदिवासी बांधवांना दिला आहे. तसेच प्रास्ताविक करताना विलास मेश्राम यांनी राणी दुर्गावती त्यांच्याकडे असलेल्या साहस दूरदृष्टी शौर्य यांच्या जोरावर मुघल सत्तेविरुद्ध लढा दिला व एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून नावारुपास आले म्हणजे आदिवासी समाज हा पूर्वीपासूनच राज्यकर्ती जमात आहे परंतु काही कारणाने ही परिस्थिती बदलली आहे ती पुन्हा प्राप्त करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन राजकीय सत्ता प्राप्त केल्या शिवाय समाजाची प्रगती होणार नाही कारण जे समाजाचे लोक आता आमदार – खासदार आहेत ते कोणत्यातरी पक्षाचे आहे यांना पक्षाच्या अजेंडा नुसार काम करावे लागते त्यामुळे हक्काच्या पक्षाला मतदान करा व पूर्वीची राजेशाही समाज निर्माण केला तर राणी दुर्गावती यांचे बलिदान सार्थकी लागेल असे मत प्रास्ताविकातून व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाला उपस्थित दिलीपजी शेडमाके जिल्हाध्यक्ष गो .ग .पा, दिलीपजी शेडमाके, विधानसभा अध्यक्ष जाम नरेंद्रजी किनाके, जिल्हा सचिव व गो.ग.प मंगेश कोकाटे वणी, विधानसभा अध्यक्ष, कमलाताई उईके रुढा, विलासजी मेश्राम वणी, रजनीकांतजी परचाके राळेगाव, विजयताई रोहणकर कळंब, गजाननजी येरकाडे कळंब, नीताताई कुळसंगे उंदरी, नरेश तुमराम बाभुळगाव, अरुण टेकाम वणी, रामभाऊ पेंदोर झरीजामणी, अंकुश आत्राम केळापूर, भीमराव पुरके मोहदा, किसन पुसनाके यवतमाळ, भावनाताई रेवडी पोलीस पाटील वाऱ्हा, लताताई घोटेकर सरपंच वाऱ्हा, रामभाऊ कोवे माजी सैनिक राळेगाव, कविताताई किनाके सरपंच आमला, सोनूताई तोडासे सरपंच आष्टा,हरीश किनाके राळेगाव, प्रभाकर कोकांडे यवतमाळ, हरिदास धुर्वे राळेगाव, दत्ताची घोटेकर तंटामुक्त अध्यक्ष वाऱ्हा,नानाजी कोवे वालधुर, अशोक कुमरे राळेगाव, नितिन मडावी, गजानन तुमराम,इत्यादी आदिवासी मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजू वाढवे, तर आभार प्रदर्शन विठ्ठल धुर्वे, यांनी केले यावेळी कार्यक्रमाला गावातील आदिवासी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
