
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव येथे वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने दि. 12/05/2022 रोज गुरवारला राळेगाव विश्रामगृह येथे नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या सत्कार समारंभ व आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत लेळगे,तर प्रमुख पाहुणे निरीक्षक शरंद वसतकर, प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा धमावती वासनिक, ज्येष्ठ सल्लागार पुष्पाताई सिरसाठ, उपस्थित होते..
वेगवेगळ्या गावातुन आलेल्या पन्नास कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी सत्कार करण्यात आला, वंचित बहुजन आघाडीची पाशभुमी समजून सांगत होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जोमाने लढुन सर्वच जागा लढविण्याचे आव्हान जिल्हा अध्यक्ष लोळगे यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राळेगाव तालुका अध्यक्ष विकास मुन यांनी केले या कार्यक्रमाला शहर अध्यक्ष दिपक आडे, सचिव प्रकाश कळसकर,अपाअधक्ष राहुल उमरे, निरीक्षक सुमेद भरने,प्रमोद म्हैसकर, रमेश पाटील,राजु वाघमारे, उमेश कांबळे,प्रभाकर भगत,भगवानजी तांगडे, चंद्रगुप्त भगत,अजय दरूके,सौ,मायाताई ठाकरे,सौ, रंजना सावध, मनोहर सावध,पुनम ऊमरे, नितेश तांगडे, डॉ,फुलमाळी,सुधाकर लोहे, संतोष धनमोडे, घनश्याम फुलमाळी,लोकेश दिवे,धनराज लाकडे,राजु उमरे,सुरज वाघमारे, मिलींद भरने,प्रकाश मुन, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते आभार प्रदर्शन पुनमकुमार उमरे यांनी केले.
