


प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा
25 एप्रिल 2019 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास पांढरकवडा वन विभाग अंतर्गत येत असलेल्या मुकुटबन वनपरिक्षेत्र मांगूर्ला नियत क्षेत्रात कक्ष क्रमांक 30 मध्ये एक वाघीण मृतावस्थेत आढळली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती. सदर घटनेची चौकशी वन परिक्षेत्र अधिकारी कुटबन व्ही. जी. वारे करीत होते, सदर गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ-पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली, यावेळी पोलीस उप अधिक्षक वणी श्री. संजय पुलजवार यावेळी पोलीस उप अधिक्षक पांढरकवडा श्री. प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी वन विभागाचे उपवनसंरक्षक सुभाष पुरानिक हजर होते, सदर ठिकाणी डॉग स्कोड, fingerprint तज्ञ यांना बोलावून कारवाई करण्याबाबत तसेच स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल, उपविभाग वणी कडील टीम, उपविभाग पांढरकवडा येथील एक टीम अशा चार टीमने तपास केला.
मा.पोलिस अधीक्षक साहेब यवतमाळ यांनी केलेले मार्गदर्शन व सुचना नुसार तयार करण्यात आलेले टीम यांनी सदर ठिकाणी राहून वेगवेगळ्या दिशांनी होणार्या तपास करून गुन्हा उघडकीस आणला आहे सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोलिस निरीक्षक धर्मा सोनोने, नापोका दिलीप जाधव, सहायक पोलीस उप निरीक्षक ऋषी ठाकूर यांनी विशेष प्रयत्न करून गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदर गुन्ह्यांमध्ये 1) अशोक लेतू आत्राम (वय 20 वर्षे) 2) लेतू रामा आत्राम ( वय 45 वर्षे) दोन्ही राहणार रा. पांढरवाणी ता. झरी जिल्हा. यवतमाळ यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून वाघिणीचे पायाचा एक पंजा व नख ताब्यात घेण्यात आणखी आरोपीचा सहभाग दिसून येत असल्याने पोलीस विभाग व वन विभागाच्या टीम रवाना केले आहे अशी माहिती यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. संदीपान भुमरे, खासदार बाळू धानोरकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
