
राळेगांव तालुका प्रतिनिधी :रामभाऊ भोयर.
दि.१२/०५/२०२१
महसूल,पोलिस. नगर पंचायत राळेगांव च्या संयुक्त मोहिमेत राळेगांव शहरात पाच दुकानदारांना,नियमांचे उल्लंघन केले त्या नुसार अठ्ठावीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलेआहे.या मध्ये चार किराणा दुकान दार,व एक इलेक्ट्रॉनिक दुकान याचा समावेश आहे. संचारबंदी सह लाँकडाऊन सुरु असून काही मुजोर महाभाग सर्रास नियमांचे उल्लंघन करतात.या मुळे कोरोणा रुग्ण वाढतच आहे .फक्त आपलाच व्यवसाय वृद्धींगत कसा होईल?अशांना जबर दंड वसूल केल्या ने इतरांना वचक बसला आहे. यावेळी तहसीलदार डाँक्टर रविंद्र कानडजे, पोलिस निरीक्षक प्रकाश तुनकलवार, सी.ओ. अरुण मोकळं सह महसूल,पोलिस,नगर पंचायत राळेगांव चे कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते….
