करंजी पोस्टवर पकडल्या देशी दारूच्या आठ पेट्या

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

होळीनिमित्त मोठ्या प्रमाणात देशी दारूची विक्री केले जाते यातही बनावट दारूचा भरणा असतो ज्या जिल्ह्यात दारूबंदी आहे अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारू या पेट्या पाठविल्या जातात काल रात्रीच्या दरम्यान करंजीचेक पोस्टवर पोलिसांनी वाहनांची तपासणी करत असताना त्यांनी आठ पेटी या दारू आणि मुद्देमाल जप्त केला. होळीनिमित्त मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या दारूची वाहतूक केल्या जात असल्याने ती पकडली गेली पाहिजे यासाठी पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी आदेश दिले आहेत या आ देशांतर्गत पांढरकवडा पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक संदीप बरीगे यांनी ठाण्यातील आपले सहकारी घेऊन करंजी चेक पोस्टवर पेट्रोलिंग सुरू केली पेट्रोलिंग करीत असताना गर्जन खैरे हा मारुती झेन मधून देशी दारूची वाहतूक करीत असल्याचे समजले. पोलिसांनी सापळा रचून महाराष्ट्र दाबा येथे गोल्डन रंगाची मारुती झेन कार पकडली त्यातून काही इसम दारूच्या पेट्या उतरवीत होते सहा पेट्या खाली ठेवल्यानंतर पोलिसांनी छापा घातला त्याच वेळी गर्जन खरे हा आपले वाहन घेऊन पळून गेला त्याचा पाठलाग केला आणि काही अंतरावर त्याला ताब्यात घेतले.