अरविंद बेंडे यांचा बाजार समिती कडून शाल श्रीफळ देऊन सन्मान

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

यवतमाळ येथील महाराष्ट्र शासन कृषी भूषण प्राप्त पुरस्कर्ते अरविंद बेंडे यांचा कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगांव च्या वतीने आज दिं २६ मार्च २०२२ रोज शनिवारला बाजार समितीचे सभापती अँड प्रफुल मानकर, व खरेदी विक्री संघाचे सभापती मिलिंद इंगोले यांनी शाल श्रीफळ देऊन बेंडे यांचा सन्मान केला .
अरविंद बेंडे यांनी सन २०११ पासून आपल्या पाच एकर शेतात शेडनेट उभारून काकडी, सिमला मिरची,टोमॅटो,कारले , दोडके,सांबर आदी पिके घेत असून ते एक आदर्श शेतकरी म्हणून त्यांना राज्यपालांकडून सात पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाकडून कृषी भूषण पुरस्कार मिळाले आहेत बेंडे यांनी शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन पाच एकर शेतात शेडनेट तयार करून विविध प्रकारचे पिके घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक वेगळी दिशा दिली त्यामुळे राळेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बेंडे यांचा सन्मान करण्यात आला .यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड प्रफुल मानकर, खरेदी विक्री संघाचे सभापती मिलिंद इंगोले, पंचायत समिती सभापती प्रशांत तायडे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजू महाजन माजी पंचायत समिती सदस्य श्यामकांत येनोरकर सुरेश पंधरे प्रकाश मेहता आदी यावेळी उपस्थित होते.