
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
जिल्हा परिषद शासकीय खासगी अनुदानित विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना आता तांदूळ शिजवून खिचडी देण्याचे आदेश शाळांना प्राप्त झाले असले तरी अद्याप पर्यंत शाळांना शालेय पोषण आहाराचा तांदुळाच पोहचला नसल्याने खिचडी शिजणार तरी कशी असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
१५ मार्च पासून शालेय पोषण आहार योजनेच्या उपसंचालकांनी खिचडी शिजविण्याचे आदेश दिले असले तरी अजून पर्यंत शाळात तांदूळ उपलब्ध झाला नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना खिचडी विना राहावे लागत आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत मध्यान भोजन दोन वर्षापासून विद्यार्थ्यांना दिले जात नसून कोरडा आहार वितरित केला जात आहे त्यामुळे शाळांमधील भोजन शिजवणारी यंत्रणा ठप्प आहे.
कोरोनाचा संसर्गकाळ लक्षात घेता मार्च २०२० पासून शाळास्तरावर शिजविलेला आहार पुरवठा करण्या ऐवजी कोरडा शिधा देण्याची देण्याचे आदेश होते त्यानुसार जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यामध्ये कोरडा शिधा विद्यार्थ्यांना देण्यात आला मध्यंतरी शाळा बंद राहिल्या शाळा सुरू झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात काही शाळांमध्ये कोरडा शिधा वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली मात्र आता १५ मार्च पासून तांदूळ शिजवून खिचडी देण्याचे आदेश शाळांना प्राप्त झाले असले तरी शाळांना अजूनपर्यंत तांदूळच उपलब्ध झालेला नसल्याने अजूनही शाळात खिचडी शिजविणे बंद आहे. त्याकरिता शासनाने तातडीने शाळांना तांदूळ उपलब्ध करून द्यावे अशी मागणी पालकांनी केली आहे.
