
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225
ग्रामपंचायत खडकी द्वारा खडकी येथील विकास कामांचे भूमिपूजन व तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंचाचा सत्कार, व गावातील गुणवंताचा गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि 10 ऑक्टोबर ला सकाळी साडेदहा वाजता आयोजित या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन पाटोदा येथील आदर्श सरपंच व महाराष्ट्रातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते भास्करराव पेरे पाटील, यशदा संस्था पुणे येथील राज्य पातळीवरील प्रशिक्षक देवीदास ढगे यांचे मार्गदर्शन लाभणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
आमदार डॉ.प्रा अशोकरावजी उईके माजी मंत्री,
तर स्वागताध्यक्ष अँड. रमेशराव पाटील झोटिंग, प्रमुख उपस्थिती चित्तरंजनदादा कोल्हे जि.प सदस्य, उषाताई भोयर जि प सदस्या, प्रितीताई काकडे जि प सदस्या,
राळेगाव पंचायत समितीचे सभापती प्रशांतभाऊ तायडे, उपसभापती शिलाताई सलाम, प्रविणभाऊ कोकाटे, पंचायत समिती सदस्य निलेशजी रोठे,सौ स्नेहाताई येनोरकर,प स सदस्या,ज्योतिताई खैरकर प स सदस्या यांची उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामपंचायत खडकी यांनी केले आहे
