
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या वतीने प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या सूचनेनुसार व युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर , माजी आ. संदीपभाऊ बाजोरिया, आ. इंद्रनील नाईक साहेब, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर (पाटील) यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मनीषा काटे(भोसले), राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हा अध्यक्षा शितल कुरटकर, यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 8 नोव्हेंबर २०२१ रोजी गॅस,पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात चूल पेटवा
आंदोलन करण्यात आले.यावेळी मोदी साहेबांना भाऊबीजीची ओवाळणी म्हणून गॅस,पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करावी म्हूणन त्यांच्या प्रतिमेला ओवाळून त्यांचं ओक्षण करण्यात आले आणि ओवाळणी म्हूणन बहिणींना महागाई कमी करावी गॅस पेट्रोल डिझेल यांचे दर कमी करावे हीच ओवाळणी मागण्यात आली, व सदर निवेदन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तहसीलदार कळंब यांच्या मार्फत पाठवण्यात आले.. यावेळी राष्ट्रवादी महिला किसांन सेल जिल्हाअध्यक्षा सारिका ताई ठोंबरे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मनीषाताई काटे(भोसले), राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हा अध्यक्षा शितलताई कुरटकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कळंब तालूका अध्यक्ष सुधाकरराव निखाडे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष शुभांगीताई चांदोरे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस कळंब तालूका अध्यक्ष किरणभाऊ येरमे, सामाजिक न्याय विभाग कळंब तालूका अध्यक्ष लक्ष्मणराव ढाले, सुमनताई ढाले, राष्ट्रवादी युवती काँग्रेस कळंब तालूका सरचिटणीस रविनाताई चौदरी, रुपालीताई चांदोरे, वैशालीताई गुलहाने,पूजाताई शेंडे, राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस चे अक्षयजी राऊत, बबलू ढगे, गणेशजी साळवे ,मंगेशजी गाठेकर,मयुरजी झाडे,रामाजी करतुके,गोपालराव उचाडे,
संतोश उचाडे , आदी उपस्थित होते.
