
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
ऊमरखेड शहरात नव्यानेच प्रारंभ झालेल्या अत्याधुनिक व दर्जेदार श्रीहरी सुपरमार्केट कृषी महाविद्यालय उमरखेड चे चेअरमन डॉ. विजय माने यांच्या संकल्पनेतून उमरखेड येथे ही सुविधा मिळण्याकरिता तयार केलेल्या प्रतिष्ठान ला महाराष्ट्र विधानसभेचे राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहीतदादा पवार यांची मराठवाडा विदर्भ दौऱ्यात सदिच्छा भेट झाली
याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव माने शिवाजीराव माने श्रीहरी सुपरमार्केटचे संचालक अक्षय पाटील माने, आकाश माने, सतीश जाधव यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी रोहीतदादा यांनी सुपरमार्केटची पहानी करून युवा वर्गानी व्यापार व्यवसायामध्ये उतरून आर्थिक सत्ता प्राप्त करावी येणाऱ्या काळात ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे असा
मोलाचा संदेश दिला याप्रसंगी
यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद यवतमाळ चे उपाध्यक्ष क्रांतीभाऊ कामारकर ,ज़िल्हा नियोजन समिती चे सदस्य डॉ.वि. ना कदम, प्रेम हनवते (ज़िल्हा अध्यक्ष सामाजिक व न्याय विभाग) उमरखेड राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकरराव तालंगकर ,भिमराव पाटील चंद्रवंशी, आशाताई देवसरकर, अविनाश वानखेडे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष बबलू भाऊ जाधव व इतर मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
