
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
बँक ऑफ इंडियाचे राळेगाव शहरातील एटीएम अज्ञात चोरटयांनी फोडले. मध्यरात्री ही घटना घडल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे दोन दिवसाआधीच SBI चे ऐटीएम फोडण्याचा देखील प्रयत्न झाला होता. बँक ऑफ इंडिया राळेगाव शाखेचे बालाजी कॅफे जवळ असलेले एटीएम काल रात्री फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली एटीएम मधून लंपास झालेल्या रकमेची माहिती अजून पर्यंत मिळाली नाही मात्र एटीएम मध्ये या चोरी होण्याआधी कॅश संपून होती असे बोलले जात आहे व नवीन केस एटीएम मध्ये भरली असता त्याच रात्री एटीएम फोडल्याची घटना घडली व अधिक तपास राळेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार करीत आहेत.
