
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
शेतकरी प्रोत्साहन योजना अनेक क्षेत्रांत राबविण्यात येतात शेती व्यवसाय हा यांत्रिक पद्धतीने मोठी उभारी घेतली आहे पण त्याच प्रमाणे बैलगाडी आणि बैलजोडी च्या माध्यमातून शेतकरी शेती करत होता आज ते प्रमाण कमी होताना दिसत आहे.
नवनवीन शेती पूरक उत्पन्न बिज प्रक्रिया करून लागवड करावी आणि आपली प्रगती करण्यासाठी कृषी क्षेत्रात शेतकरी मित्र पुरस्कार योजना शेतकरी बक्षीस योजना लकी ड्रॉ योजना कृषी क्षेत्रात केल्या जातात यात तरुण युवा शेतकरी सहभागी होताना दिसत आहे.गंगा कावेरी कापूस बियाणे लावून कुपण लकी ड्रॉ मध्ये श्रीरामपूर ( कोदुर्ली ) ग्राम स्वराज्याचा युवा शेतकरी मंगेश ठाकरे हा लक्ष्मी पुत्र ठरला त्याला महिंद्रा ट्रॅक्टर ड्रा मध्ये मिळाला म्हणून ग्राम स्वराज्य महामंच चे अध्यक्ष मा मधुसूदन कोवे गुरुजी आडे सर प्रल्हाद काळे सर बालुभाऊ ठाकरे मंगेश लढी घनश्याम गेडाम अनेक मित्र परिवार ग्राम स्वराज्य महामंच या लकी ड्रॉ मध्ये सहभागी झाले होते.
