शिवसेना तालुका प्रमुखांच्या योग्य नियोजना मुळे दोन जागी यश

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

शिवसेना राळेगांव तालुका प्रमुख विनोद काकडे यांनी नगर पंचायत राळेगांव च्या निवडणूकीत योग्य नियोजन केल्या मुळे चं दोन जागी शिवसेना उमेदवार निवडून आले आहे.
प्रभाग क्रमांक सात मध्ये संतोष शंकर राव कोकूलवार, प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सौ सिमरन इमरान पठाण हे शिवसेनेचे उमेदवार सुरुवाती पासून च आघाडीवर होते.
शिवसेना राळेगांव तालुका प्रमुख विनोद काकडे यांनी नगर पंचायत राळेगांव च्या निवडणूकीत विशेष लक्ष व योग्य नियोजन केल्या ने मागील वेळे पेक्षा दुप्पट यश पदरात पडले. मागील पंचवार्षिक मध्ये एकच नगरसेविका निवडून आली होती.
पण मात्र शहर प्रमुखाच्या आणि उपशहर प्रमुखाच्या अर्धांगिनी पराभूत झाल्या आहे. या वेळी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांनी एक हजार पंच्चानऊ मते घेतली.
तालुका प्रमुख विनोद काकडे हे रावेरी ग्रामपंचायती चे विद्यमान सदस्य असून,मागे पार पडलेल्या पंचायत समिती झाडगांव सर्कल मधून दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती .