
तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
फसवणुकीच्या गुन्ह्यातील सर्राईत आरोपीचा से दाखल करण्यासाठी १० लाखाची लाच मागुन ७ लाख रूपये घेणाऱ्या लोहारा पोलीस ठाण्यातील आरोपी अनिल इंद्रसेन घुगल यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तीनही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली.
आरोपीला जामीन देण्यासाठी त्याने तब्बल १० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. सात लाखात तडजोड झाल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यावर शहानिशा करून एसीबीने काल रात्री सापळा रचुन लाचखोर ठाणेदार अनिल इंद्रसेन घुगल याच्यासह दोन खासगी इसामांना रंगेहात पकडुन ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा पोलीस ठाण्यातील ५२ वर्षीय सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल घुगल यांना अटक करण्यात आली आहे. घुगलशिवाय विद्युत वसानी आणि विशाल माकडे (रा. यवतमाळ) या खासगी व्यक्तींवरही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदाराच्या विरुद्ध यवतमाळमधील लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये जामीन होण्यास मदत होईल, यासाठी आरोपींनी १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार ६ डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती.
🔸 लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
या तक्रारीची ६ तारखेला पंचांसमक्ष पडताळणी केली असता, आरोपींनी ७ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार ७ डिसेंबर रोजी एका मोबाईल शॉपमध्ये सापळा रचून कारवाई करताना घुगल यांनी लाचेची रक्कम विशाल माकडेच्या मार्फत स्वीकारली, तसेच विद्युत वसानी यांनी लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. त्यावरुन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या विरुद्ध यवतमाळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
