
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील जागजाई ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या संचालकपदाची निवड झाल्यानंतर आज दिनांक 16/6/2022 रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची निवड करण्यात आली.अध्यक्ष म्हणून श्री विनोदराव जयपूरकर यांची अविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी श्री राजूजी तिवाडे यांची निवड करण्यात आली.त्यावेळी संचालक अरूण कोल्हे विश्वंभर गडदे, संतोष आंबटकर, रामराव पिटेकार, वसंतराव मोहिते, प्रेमानंद वागदे,शंकर सोनारखन,शुभम बेलखेडे, महादेव खुरपुडे, गीरजाबाई इंगोले,श्रीमती नालमवार ताई, उपस्थित होते.त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी चौधरी मॅडम,व सचिव संजय उमप यांनी काम पाहिले.या निवडीमुळे सर्वत्र आनंदी वातावरण पसरले आहे.
