
.
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पंचायत समिती राळेगाव च्या वतीने हरेकृष्ण मंगल कार्यालय राळेगाव येथे “बेटी बचाओ बेटी पढाओ”अर्तगत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. केशव पवार सर गटविकास अधिकारी राळेगाव होते, प्रमुख पाहुणे म्हणून सागर विठाळकर बालविकास अधिकारी राळेगाव,विश्वकर्मा शिवणकर विस्तार अधिकारी सांख्यिकी, पर्यवेक्षीका स्नेहा अनपट ,धरती कोराम,पायल आत्राम, महीला सरंक्षण अधिकारी दिक्षा जाधव तसेच जिल्हा समन्वयक दुर्गा तुमडाम, तालुका समन्वयक रूपेश रेंगे,मोहन मेघावत, उपस्थित होते,राजमाता जिजाऊमाता व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.लताताई माटे यांनी स्वागतगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
आदिशक्ती अभियान अंतर्गत गावपातळीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे तसेच बालविवाह होवु देऊ नये याबाबत गाव बाल सरंक्षण समितीने प्रयत्न करावे अशा सुचना गटविकास अधिकारी केशव पवार सर यांनी दिल्या. तसेच राळेगाव तालुका प्रशासनाच्या वतीने तसेच गाव बालसंरक्षण समितीच्या वतीने बालविवाह रोखण्यासाठी खुप प्रयत्न करावे असे मार्गदर्शन केले,
अंगणवाडी सेविका यांनी अंगणवाडी केन्द्रांमध्ये CBE कार्यक्रमाअंतर्गत किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करावे तसेच माताबैठका, विविध योजनांची माहिती गावपातळीवर देऊन महीलांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न करावे असे मार्गदर्शन बालविकास अधिकारी सागर विठाळकर यांनी व्यक्त केले.
मासिक पाळी व किशोरवयीन मुलींसाठी स्वच्छता याबाबत सखोल मार्गदर्शन व माहिती जिल्हा समन्वयक दुर्गा तुमडाम यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका कल्पना महाकुलकर तसेच आभार पर्यवेक्षीका स्नेहा अनपट यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मोहन भोरेबाबु,शुभम ठाकरे, अक्षय रामगडे ,दिपाली भगत,वावरे (वाठोडा), आडे (गोपालनगर), र गुढे (रावेरी)यांनी प्रयत्न केले,
