
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत आंजी येथील गेल्या पाच सहा वर्षापासून गावात पाच ते सहा दारु विक्रेते हे दारू विकत आहे. गावातील काही सुज्ञ व्यक्तीनी त्यांना गावात दारू विकु नका कारन दारूमुळे आपल्या गावातील लहान मुलांना व्यसन लागले आहे भांडन तटे वाढले या कारणाने एखाद्या वेळी मोठा घात सुद्धा घडू शकतो असे सांगितले असताना सुद्धा या दारु विक्रेत्याने दारू विकने बंद केले नाही. अखेर आज गावातील महिला व पुरुषांनी ग्रामपंचायत मध्ये तातडीची मिटिंग बोलावून आंजी गाव दारूमुक्त करन्यासाठी ग्रामपंचायत मधे ठराव मंजूर करून आज रोजी सोमवार ला गावातील सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य तसेच महिला बचत गट व नागरिकांनी राळेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण जाधव यांना निवेदन दिले आहे. ठाणेदार जाधव यांनी निवेदन स्विकारुन महिलांना तुमच्या गावातील दारू बंद करु अशाप्रकारे आश्वासन सुद्धा देण्यात आले. काही महिलांनी बिटजमादार या़च्यावर आरोप सुद्धा करन्यात आले. गावात दारू विक्री चालू आहे तुम्ही या पण बिटजमादार दारु विक्रेते यांना फोन करून सांगत होता आम्ही तुमच्या गावात येत आहे. माहिती मिळताच दारू विक्रेते दारू कुठेतरी लपवून ठेवत होते. अशा प्रकारे महिलांनी माहिती दिली. आता नव्याने रुजू झालेले राळेगाव चे ठाणेदार रामकृष्ण जाधव हे आंजी येथील महिलांना न्याय देईल का व दारू मुक्त गाव करील या कडे आंजी येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
