
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225)
दिनांक १९ जुलै रोजी गट ग्रामपंचायत भांब एकबुर्जी येथे ग्रामपंचायत सदस्य नितिन झाडे यांच्या पुढाकाराने कोरोना लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 18 वर्षावरील नागरिकांनी व 45 वर्षवरील वयोवृद्ध नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. दरम्यान एकुण १०३ नागरिकांनी कोरोना लसीकरण घेऊन चांगला प्रतिसाद दिला. ह्यावेळी उपस्थित सरपंच माधुरी झाडे, ग्रामपंचायत सदस्य नितिनभाऊ झाडे ग्रामपंचायत सदस्या कु. धरती कोवे मुख्याध्यापक जुमनाके सर डॉ . निचत सर, पाटील सिस्टर डॉ धिमे सर कांबळे मेडम प्रिती मेडम तलाठी अपेक्षा गाडगे व आशा सेविका मालु खुडसंगे अंगणवाडी सेविका अंजली कुबडे किशोर कोरडे यांनी कोरोना लसीकरणाला सहकार्य केले.
