
सहसंपादक : रामभाऊ भोयर
वडकी येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत पंचायत समिती कक्ष जिल्हा यवतमाळ अंतर्गत भरारी महिला प्रभाग संघ वडकी ची आर्थिक वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन दिं.३१ जुलै २०२५ रोज गुरुवार करण्यात आले होते. या सभेच्या उद्घाटन प्रसंगी मा.ना.आदिवासी मंत्री अशोक उईके म्हणाले की महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत महिला सक्षमीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कट्टीबद्ध असल्याचे या सभेदरम्यान आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले.
या आर्थिक वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी भरारी महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा लिनाताई भगत, तर कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून प्रा. डॉ.अशोक उईके आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य होते. सभेला प्रमुख पाहुणे म्हणून केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव, नरेंद्र हलामी निवासी नायब तहसीलदार राळेगाव,मिलींद चोपडे उमेद तालुका व्यवस्थापक , डॉ .कुनाल भोयर शहर अध्यक्ष भाजपा, छायाताई पिपरे अध्यक्षा राळेगाव तालुका भाजपा, प्रशांत तायडे ,संजय खाडे, प्रविण कोकाटे,संजय काकडे , अनिल नंदुरकर, विधा लाड, व मान्यवर उपस्थित होते .
या आर्थिक वार्षिक सर्वसाधारण सभेला वडकी भरारी महिला प्रभाग संघाच्या पदाधिकरी, सर्व पशु सखी,कृषी सखी, मच्छसखी,आणि आसिआरपी, बँक सखी, उद्योग सखी,प्रभाग व्यवस्थापक, पदाधिकारी, व प्रत्त्येक गावातील प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
