पिपळखुटी येथे शिक्षणपरीषद व सेवापूर्ती समारंभ

सहसंपादक: रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील पिपळखुटी येथे दि 1 सप्टेंबर 2023 ला झाडगाव केद्रांआतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिपळखुटी येथे शिक्षण परिषद व सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला.
शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आज दिवसेंदिवस शिक्षणक्षेत्रामध्ये बरेच बदल व सुधारणा घडून येत आहे. त्या बदलाचा स्विकार करणे प्रत्येक शिक्षकाची जबाबदारी आहे., विद्येची आराध्य दैवत माता सरस्वती व स्त्री शिक्षणाच्या प्रेरणेचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा पिंपळखुटी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक के डी तुमराम हे दिनांक 31 ऑगस्ट सेवानिवृत्त झाले आपल्या वयाची 36,37 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये देऊन आपल्या कार्याचा त्यांनी शिक्षण क्षेत्रात ठसा उमटविला आहे .
त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा तसेच शिक्षण परिषदेमध्ये येणाऱ्या सर्व शिक्षकामध्ये विचाराची देवाण-घेवाण व्हावी या दुहेरी उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. सुनीताताई धोटे यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून पिंपळखुटी येथील उपसरपंच सघरक्षित गावंडे, रिजवान शेख, झाडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख सागर धनकोटवाल, विराजमान होते, तर कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून राळेगाव पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी सरलाताई देवतळे ह्या उपस्थित होत्या,
शिक्षण परिषदेमध्ये तज्ञ मार्गदर्शन श्रीमती मृनालीताई महाजन यांनी अध्ययन स्तर यांच्याबदल माहिती दिली, रमन दहिवाडे सरानी भाषा, गणित, पेटीचा वापर या विषयावर मार्गदर्शन केले,
कार्यक्रमामध्ये गटशिक्षण अधिकारी यांनी शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले सेवानिवृत्त तुम राम सर यांना शाल श्रीफळ व काही भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाने विशेष शिक्षक दुर्गे सर प्रीती वासेकर , मागल्य चौधरी सर, अमोल पोहनकर सर, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहा सर, तर आभार प्रदर्शन पिपंळखुटी शाळेचे नवनियुक्त प्रभारी मुख्याध्यापक पुंडलीक देवतळे यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राऊत मॅडम व केंद्रप्रमुख सागर धनकोटवाल सर यांनी प्रयत्न केले.