
फुलसावंगी प्रतिनिधी- संजय जाधव
जेष्ठ पत्रकार तसलीम शेख अय्युब यांची नव्याने युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या महागाव तालुका कार्यकारिणीत वर्णी लागली असून त्यांची नियुक्ती महागाव तालुका उपाध्यक्ष पदावर करण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रभर युवा ग्रामीण पत्रकार संघटना सध्या जोर धरत आहे. त्यात
फुलसावंगी येथील जेष्ठ पत्रकार फुलसावंगी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तसलीम शेख अय्युब यांची महागाव तालुका उपाध्यक्ष पदावर जिल्हा अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांनी राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकवार यांच्या आदेशाने नियुक्ती केली आहे.नुकतीच युवा ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारणी घोषीत करण्यात आली असून यात प्रथमच फुलसावंगी सारख्या ग्रामीण भागातून तसलीम शेख यांच्या रूपाने नेतृत्व करण्याची संधी दिली गेली आहे.पत्रकारांवर होणारे भ्याड हल्ले, खोटे गुन्हे नोंदी सह ग्रामीण पत्रकारांना शासकीय स्थरावरील सुविधांच्या चोकटीत आणण्यासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघ सातत्याने पत्रकारांच्या समर्थनात लढा देत आहे.शेख यांना पत्रकारिता क्षेत्रातील असलेला दांडगा अनुभव ग्रामीण पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी कामी येईल असा विश्वास संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.तसलीम शेख यांच्या नियुक्ती चे सर्व स्थरातून स्वागत केले जात आहे.
