निवडणूक राळेगाव विधानसभेची , मतदारांच्या मनातील भावी आमदार कोण?

सहसंपादक : रामभाऊ भोयर

विधानसभा निवडणुक जशी जशी जवळ येत आहे तसं तसे उमेदवार आपल्या मार्फत आपल्या लोकांमार्फत आपण काय केले आणि काय करणार आहोत. याचा केविलवाणा प्रयत्न मतदारांसमोर करत आहे.हे मात्र निवडून येईल तो पर्यंत पुरेसा त्यानंतर तर कुठल्याही नवनिर्वाचित आमदारांना गोरगरीब जनता, शेतकरी शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगारांच्या मागण्या यांचे देणे घेणे रहात नाही.शासनाकडून येणाऱ्या योजना मतदारसंघात आणून मी योजना आणल्याचा कांगावा केला जातो.परंतू मतदारसंघातील लोकांवर आलेल्या नैसर्गिक संकटात या महोदयांना त्या गावाला भेट सुद्धा द्यायला वेळचं मिळत नाही.त्यावेळी मात्र हे मान्यवर आपल्या अतिजवळच्या कार्यकर्त्यांना कसे खूश ठेवता येईल यामागे लागले असतात. सत्तेवर असणाऱ्या आमदार साहेबांनी खूप विकास खूप योजना आणल्याचा केलेला कांगावा हा त्यांनी जर विकास केला असेल तर का करावा लागतो हे मात्र समजायला मार्ग नाही.अशाच प्रकारे माजीच्या बाबतीत सुद्धा असेच म्हणावे लागेल की निवडणुकीत निवडून आणायचे आहे त्यावेळी कष्ट करणारे कार्यकर्ते मात्र निवडून आल्यानंतर दिसतच नाही मग मात्र गर्दी करतात हे निश्चित संधी साधू करत असतात त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता, निस्वार्थी कार्यकर्ते यांना मात्र नक्कीच डोकेदुखी वाढवणारे असल्याने या वेळी निवडणुकीत आजी आणि माजींना सोडून कदाचित तिसरा पर्याय तर शोधणार नाही ना असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. आजपर्यंत ज्या पद्धतीने जनतेला भुरथापा देऊन मतदाराला मतदान करून घेणाऱ्या उमेदवारांना यावेळी नक्कीच आपल्या मतदानाचा गेस देणार नसून या पुढाऱ्यांनी मतदारांना दिलेला मंत्र यावेळी त्यांच्याच अंगावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.सोबतच शेतकऱ्यांना कापसाला भाव, तुरीला भाव, अन्न धाण्यांना भाव समाधानकारक मिळत नसल्याने आणि जिवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने सरकार एका हाताने देऊन दुसऱ्या हाताने काढून घेत असल्याचे दिसून येत असल्याने मतदार यावेळी निवडणुकीत फार विचारपूर्वक मतदान करणार असल्याचे एका जबाबदार मतदाराने बोलताना प्रतिनिधी जवळ सांगितले.