अंजनगाव बारी येथे मोफत रोगनिदान तपासणी व मार्गदर्शन शिबीर

सहसंपादक : रामभाऊ भोयर

ग्रामपंचायत महिला बचत गट भवन येथे जगताप हॉस्पीटल, राजापेठ, अमरावती यांच्या आयोजनात भव्य मोफत रोगनिदान, तपासणी व आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन १५ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. या शिबिराचा तज्ज्ञ डॉ. गौरव सुरेश जगताप (टिमटाळा), कंन्सल्टंट फिजीशियन हृदय रोग व मधुमेह तज्ञ, आय.सी.यु.
स्पेशालिस्ट कंन्सल्टंट अच्युत
महाराज हार्ट हॉस्पीटल, अमरावती तसेच स्त्रिरोग व प्रसुती तज्ञ डॉ. नुपूर गौरव जगताप यांच्या मार्गदर्शनात होणार आहे.

या शिबिरात सर्व आजारांवरील तपासणी मोफत करण्यात येणार असुन हृदयरोग तपासणी, बी.पी, शुगर, थॉयराईट, फुफ्फुसाचे आजार, अर्धांगवायू, दमा, क्षयरोग, विषबाधा निदान व उपचार, पोटाचे विकार, किडणीचे विकार, काविळ, टायफाईड, मलेरिया, स्त्रियांचे आजार या व इतर आजारांच्या सर्व तपासण्या व सुविधा मोफत करण्यात येणार आहे.