जनसामान्यांचे हित साधणारा सरपंच नागेश धनकसार

प्रतिनिधी नितेश ताजणे वणी


वणी : तालुक्यातील कायर ही ग्रामपंचायत बाजारपेठेचे गाव असून या गावांमध्ये नुकतेच काही दिवसापूर्वी निवडून आलेले सरपंच नागेश धनकसार यांच्या नावाची सर्वत्र ग्रामस्थातून चर्चा होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते ” सरपंच असावा तर असा ” म्हणून त्यांची ख्याती सर्वत्र पसरलेली आहेत.
गावातील गोरगरीब यांच्या समस्यांना धावून जाणारे सरपंच म्हणून नागेश धनकसार यांची एक लौकिक ओळख आपल्याला पाहायला मिळते सर्व ग्रामस्थातून सरपंचाच्या कार्याबद्दल उदो उदो होत असल्याचे दिसून येते . ” जणू काही कायर गावातील सरपंच जगताप माणूस पण ” असे सर्वत्र ग्रामस्थांमधून चर्चा होत आहे.

नागेश धनकसार यांनी अनेक गोरगरीब विधवा, अपंग, वृध्द, लोकांसाठी शासनाच्या वतीने आर्थिक सहाय्य मिळावे याकरिता स्वतः पाठपुरावा करून अनेकांना निराधार या योजनेचा लाभ मिळवून दिला. जनतेच्या सेवेसाठी सोयीस्कर असे कॅम्प राबवणे, गावातील कुठलीही समस्या असो त्यावर योग्य निर्णय घेऊन समस्येचे तात्काळ निवारण करणे, जनहितार्थ दृष्टीकोनातून आंदोलने करणे, गावातील जंतुनाशक फवारणी करणे, ब्लिचिंग पावडर टाकून पिण्याचे पाणी शुद्ध करणे. नाल्याची सफाई दोन महिन्यातून एक वेळा करणे, यामुळेच कायर ग्रामपंचायतचे सरपंच यांची ख्याती सर्व गावातून लौकिक होत असल्याचे पाहायला मिळते.
कायर गावचे सरपंच नागेश धनकसार यांनी शासनाच्या वतीने अनेक योजनांचा पाठपुरावा करून गावांमध्ये योजनेअंतर्गत गाव सुधार दृष्टिकोनातून कामे आणली. उद्घाटनही केले, आणि त्या गावातील कामे जोरात सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे समस्त जनतेतून चर्चा होत आहे की ” सरपंच असावा तर असा” अशी ओळख नागेश धनकसार यांच्या कार्यातून प्रेरित होत असल्याचे दिसून येते.