पिकाची नासधूस करणाऱ्या गुंडावर त्वरित कारवाही करा अन्यथा मुकुटबन पोलीस स्टेशन समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार :किसानसभा

प्रतिनिधी:शेखर पिंपळशेंडे,मुकुटबन

मुकुटबन येथून जवळच असलेल्या तेजापूर येथील अतिक्रमण धारक शेतकऱ्यांच्या शेतातील पीक उपडून नासधूस करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करा , या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसानसभेच्या वतीने आज पोलीस स्टेशन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले .
याबाबत सविस्तर असे की , तेजापूर येथील दलित आदीवासी व इतर मागासवर्गीय गैरआदिवाशीस याचे मागील ३० वर्षांपासून अडेगाव येथील खंड क्र.२ वर अतिक्रमण करून शेतीमाश्यागत करत आहे व त्यामधून उत्पन्न घेऊन आपल्या कुटुंबाची उपजीविका करून देशातील अन्नधानायचे कोठार भरण्याचे काम करीत आहे .या जिमिनीचा पट्टा मिळावा म्हणून किसांनसभा सतत आंदोलन करीत आहे . तसेच तेजापूर येथील शेतकऱ्यांनी पट्टा मिळण्याकरिता त्याचा दावाअर्ज संबंधित विभागास पाठविला आहे , त्यावर अजूनही कोणतीही कारवाही झाली नाही , किंबहुना सादर शेतकऱ्यांना जमिनीवरून बेदखल करण्याचा कोणत्याही धोरणात्मक निर्णय झालेला नाही . तसेच शेतकऱ्यांना पट्टा देण्यासाठी सरकार विचाराधीन आहे . असे असताना शेतकार्यच्या शेतामध्ये बडजबरीने घुसून त्यांचे पीक चारून व पीक उपडून पिकांची नासधूस करण्याचा आमोलन येथील काही गावगुंडांनी प्रयन्त केला आहे . ही निषेधार्थ बाब आहे .
पुढे असे की , दि. २६ जून२०२१ ला गैरअर्जदारानि शेतातील पिकात बकऱ्या घालून उभे पीक चारले याबाबत पोलीस स्टेशन मुकुटंबन मध्ये तक्रार दिली मात्र यावर कोणतीही कारवाही झाली नाही , त्यामुळे गुन्हेगाराची हिम्मत वाढली व दि.२६जुलै २०२१ रोजी शेतामध्ये बडजबरीने घुसून शेतातील उभे पीक उपडून नासाधून करून सर्व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केला आहे . याला मुकुटंबन पोलीस प्रशाशन जबाबदार असून याही प्रकरणात गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून होत आहे . असे किसानसभेचे स्पस्ट मत आहे .
पोलीस विभाग राजकीय दबावात येऊन काम करीत असून शेतकऱ्यांच्या शेतातील पीक उध्वस्त करणाऱ्यां गुन्हेगारावर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे .
त्यामुळे गुन्हेगारांना त्वरित अटक करा अन्यथा पोलीस स्टेशन मुकुटंबन समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू प्रसंगी पोलीस स्टेशन ला घेराव घालू असे किसान सभेचे कॉ. शंकरराव दानव कॉ.ऍड. दिलीप परचाके कॉ. मनोज काळे यांच्यासह रक्तदान महादान फाऊंडेशनचे अध्यक्ष मंगेशभाऊ पाचभाई यांनी असा तीव्र इशारा निवेदनातुन दिला आहे .