

चंद्रपूर आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनानंतर त्यांची खासदार पदाची जागा रिक्त झाल्याने लवकरच पोट निवडणूक होईल असे संकेत दिसत आहे.त्यासाठी निवडणुकीत लागणारे सर्व साहित्याबाबत अंदाजित मागणी करण्याच्या सूचना पत्र मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयातून जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी यांना प्राप्त झाले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने चंद्रपूरची पोटनिवडणूक जाहीर झाल्यास चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुनर्वापर करण्याजोगे आवश्यक साहीत्य उपलब्ध आहेत किंवा नाही याची चाचपणी करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे.. यामध्ये शपथपत्र (Form 26), नामनिर्देशित पत्र (Form २A), Form A and Form B, निवडणूक आलेल्या उमेदवाराला द्यावयाचे प्रमाणपत्र (Form 22), बोटाला लावायची शाई, पिंक पेपर सील आणि ग्रीन पेपर सील यांबाबत तात्काळ आढावा घेऊन अंदाजित मागणी करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत.
त्यामुळे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पुणे लोकसभेच्या जागेबरोबरोच चंद्रपूर लोकसभेची देखील पोटनिवडणुक लागणार काय? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.
निवडणूक आयोगाने चंद्रपूरची पोटनिवडणूक जाहीर झाल्यास चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुनर्वापर करण्याजोगे आवश्यक साहीत्य उपलब्ध आहेत किंवा नाही याची चाचपणी करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे.. यामध्ये शपथपत्र (Form 26), नामनिर्देशित पत्र (Form २A), Form A and Form B, निवडणूक आलेल्या उमेदवाराला द्यावयाचे प्रमाणपत्र (Form 22), बोटाला लावायची शाई, पिंक पेपर सील आणि ग्रीन पेपर सील यांबाबत तात्काळ आढावा घेऊन अंदाजित मागणी करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत.
त्यामुळे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पुणे लोकसभेच्या जागेबरोबरोच चंद्रपूर लोकसभेची देखील पोटनिवडणुक लागणार काय? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.
