
श्री सीमेंट लिमिटेड यांच्या प्रस्तावित कोंढाळा चुनखडी खाण प्रकल्पाबाबतची सार्वजनिक सुनावणी कोंढाळा येथे यशस्वीरीत्या पार पडली.
ही जनसुनावणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घेण्यात आली. जनसुनावणी सुनावणीचे अध्यक्षस्थान निवासी जिल्हाधिकारी यांनी भूषविले. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, प्रशासनाचे प्रतिनिधी, श्री सीमेंट लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी तसेच मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
सार्वजनिक सुनावणीदरम्यान श्री सीमेंट लिमिटेडच्या प्रतिनिधींनी प्रकल्पाची सविस्तर माहिती, पर्यावरण संरक्षण उपाययोजना, धूळ व आवाज नियंत्रण, पाणी व्यवस्थापन, सुरक्षित ब्लास्टिंग पद्धतीची सादरीकरण केले.
दरम्यान, संबंधित अनावश्यक सर्व प्रश्नांची नोंदही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली, तसेच ग्रामस्थांच्या प्रश्नांची उत्तरे श्री सीमेंट व्यवस्थापनाने योग्य पद्धतीने व मुद्देसुद दिली.
श्री सीमेंट व्यवस्थापनाने नमूद केल्याप्रमाणे श्री सीमेंट कंपनीने जमीन सरळ शेतकऱ्यां कडून विकत घेतली, यामध्ये तिसऱ्या कोणालाही सामील केलेले नाही, त्यामुळे जमिनीसंबंधी प्रश्न व पैसे यांच्यासंबंधीचा मुद्दा वैध नाही. तसेच, कंपनीने शेतकऱ्यांना योग्य मोबदला व योग्य रक्कम दिली आहे.
श्री सीमेंट कंपनीबद्दल सांगायचे झाल्यास, ही एक नामांकित उद्योग समुह आहे व प्रकल्प सुरू करण्यापूर्वीच या समुहानी जवळपासच्या गावांमध्ये आपली सी.एस आर. ची कामे सुरू केली आहेत, लोक या प्रकल्पाला समर्थन देत होते कारण त्यांना माहित होते की या प्रकल्पाद्वारे त्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी मिळणार आहेत, ज्यामुळे त्यांचे जीवनमान उन्नत होईल.
