
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
यवतमाळ येथील गोदनी रोडवरील शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयासमोर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने विविध मागण्या घेऊन निदर्शने करण्यात आली व नतंर शिक्षणाधिकारी कार्यालयातील वेतनपथक अधिक्षक जाधव साहेब व विस्तार अधिकारी शेंडगे साहेब यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतिक उपाध्यक्ष अरविंद देशमुख,यवतमाळ जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे, यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष विजय खरोडे, जिल्हा उपाध्यक्ष पवन बन, राळेगाव तालुका अध्यक्ष दिगांबर बातुलवार,विलास वाघमारे, व्ही एन सोनवने,ए जे करमनकर,देवळे सर यांच्यासह अनेक जेष्ठ आणि श्रेष्ठ शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.
