
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
वडकी येथील तीन घर फोडल्याची घटना ताजी असतांना च आज दिवसा ढवळ्या राळेगाव शहरात दरोडा पडल्याची घटना घडल्याची माहिती समोर येतं आहे. दुपारी साडे बारा च्या दरम्यान ही घटना घडली.
शहरातील माता नगर येथील निकम यांचे घरी मायक्रो फायनास वाल्यांना चोरटयांनी लक्ष केले. निकम यांचे घरी दरोडा पडला. चोरटयांनी सहा लाख कैश व इतर साहित्य असे एकूण आठ लाख रुपये पळवल्याची प्राथमिक माहिती समोर येतं आहे. या बाबत अधिक तपास राळेगाव पोलीस करीत आहे.
