
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
महावितरणकडून शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची वीज कापली जात आहे. एक देयक थकले तरी घरगुती वीजपुरवठा खंडित केला जात आहे. याबाबत आज (ता. सात) पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भारतीय जनता पक्षाचे आमदार आक्रमक झाले. त्यांनी काही काळ विधिमंडळाचे कामकाज चालू दिले नाही, अशी माहिती राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनी “लोकहीत महाराष्ट्र” शी बोलताना दिले.
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील, सुधीर मुनगंटीवार यांनी
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. या अधिवेशनात आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनीही शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न उपस्थित करीत कर्जमाफी योजनेचा शेतकऱ्यांना लाभ देण्याची मागणी लावून धरली. ज्या शेतकऱ्यांनी २०१९ मध्ये २ लाखांपेक्षा जास्त कर्ज भरले त्यांना अजूनही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नाही.५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कमही मिळाली नाही. नियमित कर्ज भरणाऱ्या दादा शेतकऱ्यांनाही कर्जपुरवठा केला जात नाही. आदी प्रश्नही त्यांनी विधिमंडळात उपस्थित केले.
