

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
श्री राम मंदिर राळेगाव येथे पतंजली योग समिती व राष्ट्रीय स्वंयसेवक संघ यांचे संयुक्त विद्यमाने दि.15/ 6/2021 पासुन योग सप्ताहाची सुरूवात करण्यात आली होती,त्याची सांगता 21/6/2021 रोजी 7 वा. आंतरराष्ट्रीय योगदीन साजरा करून करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरूवात राळेगावचे पोलिस निरीक्षक मुडे साहेब यांचे हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी कार्यक्रमासाठी रा.स्व.संघाचे यवतमाळ विभागाचे सहकार्यवाह अंकुशरावजी रामगडे व सर्व कार्यकर्ते, ग्रामीण विकास प्रकल्पाचे मेंडूलकर साहेब, डॉ.कोकरे साहेब पतंजली योग समीतीचे सर्व कार्यकर्ते,दुर्गा वाहिनीच्या भगीनी यावेळी उपस्थित होत्या.यावेळी योगशिक्षक अँड. मोहन देशमुख व सुरज गुजरकर यांनी सर्वांना योगचे धडे दिले. मेघश्यामजी (मामा) चांदे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
