
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रिधोरा येथील शेतकरी रामेश्वर देवरावजी कोकाटे वय ५० वर्ष यांचे शेतातून १६ मे रोजी मध्य रात्री अंदाजे ५० हजार रुपये किंमतीचे रोटावेटर चोरीला गेले असुन या संदर्भात वडकी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.सविस्तर वृत्त असे.रिधोरा परिसरात अज्ञात चोरट्यांनी मोठा धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्यांच्या शेतातून मोटार पंप चोरीला गेला होता या संदर्भात वडकी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली होती तक्रार देताच चोरट्यांनी चार ते पाच दिवसांनी चोरी केलेला मोटर पंप परत आनुन ठेवला तर एका शेतकऱ्यांच्या शेतातून तीन पोते तुर चोरून नेली तर काही शेतकऱ्यांच्या शेतातून पाईप चोरून नेले अशा एक ना अनेक घटना या परिसरात घडतांना दिसून येत आहे. कोणी वडकी पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर कोणी काय छोट्या मोठ्या गोष्टीची तक्रार द्यायची म्हणून गप्प बसून आहे. सदर ग्रामीण भागातील शेतकरी यांना गावामध्ये जागा अपुरी पडत असल्या कारणाने गुरेढोरे व शेती उपयोगी लागणारे साहित्य हे ९० टक्के आप आपल्या शेतातच ठेवतांना दिसून येत आहे.परंतु आता या परिसरात चोरट्यांचे प्रमाण वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या गावगुंड चोरट्यांना वेळीच आळा न घातल्यास अजून कितेक शेतकऱ्यांना चुना लागेल याचा काही अंदाज नाही असे मंत शेतकरी रामेश्वर देवरावजी कोकाटे यांनी व्यक्त केले.
