राळेगांवात कापसाला सात हजार दोनशे एक रुपये प्रतिक्विंटल भाव…

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

दहा दिवसात सात हजार क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी



आज राळेगांवात कापसाला सात हजार दोनशे एक रुपये प्रतिक्विंटल भाव भाव मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे हे विशेष..
खाजगी कापूस व्यापारी बांधवांनी अवघ्या दहा दिवसापुर्वी राळेगांवात कापूस खरेदी केली.या कालावधीत तब्बल सात हजार क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी झाली आहे.
पाच ते सहा जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी मध्ये कापूस खरेदी सुरु आहे.
येत्या दोन तीन दिवसात धान्य लिलावा सह कापसाचा लिलाव सुरु करण्याचा मानस असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगांव सभापती ॲड प्रफुल्ल भाऊ मानकर यांनी लोकहित महाराष्ट्र शी बोलताना सांगितले आहे. पाऊस सतत पडत च आहे. त्यामुळे सर्व व्यापारी बांधव यांचेशी चर्चा करुन लिलाव सुरु करु असे सांगितले आहे.
या वेळी मोठे कापूस खरेदीदार राळेगांव सह इतर कापूस संकलन केंद्रा वर आल्या ने शेतमालाला बऱ्या पैकी भाव मिळेल असा विश्वास वाटतो आहे…