
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)
राळेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड प्रफुल मानकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज दिं १२ फेब्रुवारी २०२२ रोज शनिवार ला तूर व सोयाबीन पिकाविषयी मार्गदर्शन व शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण शिबिराला मार्गदर्शक म्हणून मा. डॉ. सतीश निवल वरिष्ठ पैदासकार सोयाबीन संशोधन केंद्र पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अमरावती, व मा. डॉ. एकनाथ वैद्य संशोधन शास्त्रज्ञ तुर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला हे लाभणार आहेत.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. श्री माणिकराव ठाकरे माजी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. वसंतरावजी पुरके माजी शिक्षण मंत्री तथा उपाध्यक्ष आदिवासी विकास महामंडळ नाशिक, तर सत्कार मूर्ती मा. श्री. एडवोकेट प्रफुल भाऊ मानकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव हे असणार आहेत.
तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री रमेश एन कटके जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ, मा. श्री विलास भोयर माजी संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ, मा. श्री अरविंद वाढोनकर संचालक व्ही सी एम एस नागपूर, मा. श्री नंदकुमार गांधी सभापती वसंत जिनिंग-प्रेसिंग सोसायटी राळेगाव, मा. श्री मिलिंद इंगोले सभापती खरेदी विक्री संघ राळेगाव,मा. सौ वर्षाताई राजेंद्र तेलंगे विभागीय अध्यक्ष पांढरकवडा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ,मा.श्री अरविंद फुटाणे तालुका अध्यक्ष तालुका काँग्रेस कमेटी राळेगांव, मा. श्री कैलासजी कटरे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था राळेगांव यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे तरी या शेतकरी प्रशिक्षण व तूर सोयाबीन पिकाविषयी मार्गदर्शन शिबिराचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ,उपसभापती, सचिव ,तथा संचालक मंडळाने केले आहे.
