
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
जागतिक आरोग्य दिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने तसेच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून दिं ५ जुलै २०२२ रोज मंगळवारला महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
या महारक्तदान शिबिराचे आयोजन तहसीलदार डॉ रवींद्र कानडजे व निवासी नायब तहसीलदार दिलीप बदकी यांच्या वतीने करण्यात आले असून रक्तदान शिबिर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत सभागृह तहसील कार्यालयात घेण्यात आले असून या महारक्तदान शिबिराचे उद्घाटन मा.उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी रक्तदान करून केले तर शिबिरामध्ये वनसंरक्षक अनंत दिगोडे गट विकास अधिकारी, पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी मडावी ,तालुका मनसे अध्यक्ष शंकर वरघट तसेच नगरसेवक बाळू धुमाळ आदी प्रमुख व मान्यवर रक्तदात्यांनी रक्तदान केले असून या रक्तदान शिबिरात ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले
,सहायक गटविकास अधिकारी यांनी रक्तदान केले.या महारक्तदान शिबिराच्या यशस्वीते करीता दिलीप बदकी निवासी नायब तहसीलदार, पाटील वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय व त्यांची चमू तसेच तहसील कार्यालयातील कर्मचारी,तलाठी यांचे योगदान उल्लेखनीय लाभले.
