
राळेगांव तालुका प्रतिनिधी:– रामभाऊ भोयर. राळेगांव
तालुक्यातील वरुड (ज ) येथे वीज पडून सात बकऱ्या ठार झाल्याची घटना काल १६ मे २०२१ रोज रविवारला दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की वरुड (ज) गावातील शेरकी बकऱ्या चराईला जंगलात गेला असता पावसाचा अंदाज दिसत असताना तो घराकडे येत असताना दुपारी चार वाजताच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली त्यावेळी गावालगतच्या शेतात बकऱ्या झाडाखाली थांबल्या असताना वीज पडून एकूण सात बकऱ्या दगावल्या आहे.
यात पंडित चव्हाण यांच्या तीन बकऱ्या व चंद्रभान नेहारे यांच्या दोन नारायण शिवणकर यांची एक तर सुभाष चव्हाण यांची एक बकरी अशा एकूण सात बकऱ्या दगावल्या असून वीज पडल्याची बाब गावातील नागरिकांना कळताच गावकऱ्यांनी गावालगतच्या शेतात एकच गर्दी केली आहे.
