
राळेगांव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्या अंतर्गत येत असलेल्या मौजा देवधरी येथे कोविड लसीकरण केलेल्या लाभार्थ्यांना एका भूमिहीन शेतकरी मजुराने नास्ता, फराळाचे वाटप केल्याने त्यांच्या ह्या कार्याचे परिसरात कौतुक केले जात आहे.
बुधवार दि. ०७ जुलै २०२१ रोजी ग्राम पंचायत कार्यालय,देवधरी येथे दहेगाव येथील आरोग्य विभागाच्या चमूने कोविड लसीकरण केले.
सध्या ग्रामीण भागात लसीकरणाबाबत गैरसमजुती फोफावत चालत असल्याचे लक्षात घेऊन गावात लसीकरणाला चांगल्या त-चांगला प्रतिसाद मिळावा ह्या करिता देवधरी येथील बंडूजी भारसाकरे ह्यांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थांना प्रोत्साहीत केले आणि लसीकरण केलेल्या लाभार्थ्यांना नास्ताचे वाटप केले. त्यांच्या ह्या कार्याला गावातील लोकांनी भरभरून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ह्या छोट्याशा गावात १४४ लोकांनी लाभ घेतला.
विशेष असे की, ते भूमिहीन शेतमजूर आहे. हातावर आणुन पानावर खावं, अशी बेताची परीस्थिती बंडू भारसाकरे ह्याची आहेत. अश्या बिकट परीस्थिती मध्ये भारसाकरे यांचे काम वाखाळण्याजोगे आणि कौतुकस्पद असल्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटू लागली आहे.
अश्या खऱ्या ‘ कोविड योद्धा’चे अभिनंदन आणि कौतुक आर. आर. साटोने सामुदायीक आरोग्य अधिकारी, एच. एम. ताकसांडे आरोग्य सेविका, एस. बी. बोरपे आरोग्य सेवक, सौ.गीता टेकाम आशा सेविका,सौ.अश्विनी वाढई गटप्रवर्तक आणि समस्त देवधरी येथील ग्रामस्थांनी केले आहे.
