
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव शहरात उध्या दिनांक ११ रोज सोमवार ला सकाळ पासून कोरोना लसीकरण नागरिकांकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
यामध्ये आदर्श दुर्गोत्सव मंडळ तहसील कार्यालया समोर, इंदिरा नगर प्रभाग १५, एस. टी. बस डेपो शिवाजी नगर, राम मंदिर, ग्रामीण रुग्णालय राळेगाव या ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे, सर्व नागरिकांना आदर्श दुर्गोत्सव मंडळ, राम मंदिर समिती, तहसीलदार राळेगाव, तालुका आरोग्य अधिकारी राळेगाव, पोलीस निरीक्षक राळेगावव नगर पंचायत राळेगाव प्रशासनाकडून शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या स्वतःच्या, कुटंबाच्या, आणि समाजातील सर्वांसाठी कोरोना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
