नगर पंचायत राळेगांव चे नवनिर्वाचित नगराध्यक्ष रविंद्र शेराम

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

नगर पंचायत राळेगांव च्या नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षाचे रविंद्र शेषेराव शेराम यांनी आज नामांकन पत्र दाखल केल्याने,शहरात समाधान व्यक्त केले जात आहे.नगराध्यक्ष पदासाठी दोन प्रती मध्ये नामांकन पत्र दाखल केले आहे.
अविरोध नवनिर्वाचित नगराध्यक्ष रविंद्र शेराम हे चौदा फेब्रुवारी रोजी आरूढ होणार आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठी नी हा निर्णय घेतला,या वेळी काँग्रेस पक्ष निरिक्षक नरेंद्र ठाकरे सह,काँग्रेस पदाधिकारी आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवक,नगरसेविका उपस्थित होते.