पाच लाखांच्या वाहनासह देशी दारूच्या चार पेट्या जप्त. , वडकी पोलिसांची कारवाई.


राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225)


एका चार चाकी वाहनातून देशी दारूची अवैधरित्या वाहतूक करीत असताना दोन संशयित आरोपींसह पाच लाखांचे वाहन व अवैध देशी दारूच्या चार पेट्या वडकी पोलीसांनी जप्त केल्या आहेत.हि कारवाई १८ जुनच्या मध्यरात्री वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खैरगांव चौफुलीवर करण्यात आली.
कृझर या वाहनातून अवैध देशी दारूची वाहतूक केली जात असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे वडकीचे ठाणेदार विनायक जाधव यांनी आपल्या पथकासह हद्दीतील खैरगांव जवादे चौफुलीवर सापळा रचून एम.एच.२९.ए.आर.१०६३ या क्रमांकाच्या कृझर वाहनाची तपासणी केली असता वाहनात गोवा देशी दारूच्या चार पेट्या आढळून आल्या.या प्रकरणी अतुल येरकाडे व मारोती घुंगरे यांना ताब्यात घेऊन त्यांचे कडून देशी दारूच्या चार पेट्या अंदाजे किंमत ९ हजार ९८४ रुपये, दोन मोबाईल किंमत अंदाजे १० हजार रुपये व कृझर अंदाजे किंमत ५ लाख रुपये असा एकूण ५ लाख १९ हजार ९८४ रुपयांचा मुद्देमाल वडकी पोलीसांनी हस्तगत केला असुन आरोपींविरुद्ध दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा कायम केला आहे.हि कारवाई ठाणेदार विनायक जाधव यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार विलास जाधव,रुपेश जाधव,सुरज चिव्हाने व विकेश धावर्तीवार यांनी पार पाडली.