राळेगाव नगरपंचायत करिता भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

दि. 17/12/2021 रोजी राळेगाव नगर पंचायत निवडणुकीकरिता भारतीय जनता पार्टी राळेगाव यांच्या वतीने मागील काळात असलेली सत्ता व केलेला विकास आणि पुढील विकासाचे नियोजन असा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला, विद्यमान आमदार प्राचार्य डॉ अशोक उईके यांनी होणारी नगर पंचायत निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्यांवर लढवित आहे असे सांगितले.1ॲड प्रफुलसिंह चौहान जिल्हा मंत्री यांनी मागील काळात केलेले विकास कामे या कडे जनतेने बघून पुन्हा एकदा भाजपाला स्पष्ट बहुमत द्यावे असे सांगून पुन्हा एकदा कमळ फुलवा असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी तालुका अध्यक्ष चित्तरंजनदादा कोल्हे व शहराध्यक्ष डॉक्टर कुणाल भोयर यांच्या वतीने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. पत्रकार परिषद मध्ये तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अशोक पिंपरे सह सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.,..