
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस स्टेशन राळेगाव येथे दक्षता महिला समिती सदस्यांचा ठाणेदार संजय चोबे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार ! करण्यात आला .शोभाताई इंगोले, माधुरीताई डाखोरे,करुणाताई वानखडे, निमिताताई लभाने, प्रणालीताई धुमाळ, रेखाताई कुमरे, अॅड. रोशनीताई वानोडे, (सौ कामडी ) यांचा सत्कार करण्यात आला.नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा संघटक यवतमाळ जिल्हा संघटक ड. रोशनी वानोडे यांनी ठाणेदार संजय चोबे नशाबंदी मंडळाचे पत्रक दिले. त्यावेळी त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले व व्यसन मुक्तीच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता युवराज पाईकराव व इतर पोलिस बांधवांनी सहकार्य केले.
