
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
जि.प. उच्च प्राथमिक शाळा येरला येथे आज दिनांक 19/04/2022 ला शाळा पूर्व तयारी .मेळाव्याचे आयोजन करण्यात आले . सर्वप्रथम प्रभातफेरी काढण्यात आली .त्यामधून शिक्षणाविषयी जागृती गीत व घोषणा देण्यात आल्या . त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याचे रितसर उदघाटन मा. श्री . जयंतराव कातरकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती येरला यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय कुंभारे यांनी केले त्यांनी प्रास्ताविके मधून मेळाव्या विषयी माहिती सांगितली व कार्यक्रमाची रूपरेखा स्पष्ट केली . कार्यक्रमाला मा. श्री. ज्ञानेश्वरराव सुपारे केंद्रप्रमुख , तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्रीमती शुभांगीताई नगराळे , श्रीमती सिमाताई टापरे , सौ प्रणिताताई आडे , सौ मंगलाताई जोगी , सौ . सुनिताताई उमाटे व नव्याने पहिलीत दाखल होणारे सर्व पाल्य व त्यांचे पालक उपस्थित होते. शाळा पूर्व तयारी मेळाव्यातून माता पालकांचा सहभाग वाढविणे. आपल्या मुलांच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टीकोणातून मुलांचा शारिरीक विकास , बौद्धीक विकास, भाषा विकास, गणन पूर्व तयारी . या क्षमताचा विकास होण्यास मदत करण्याकरिता या मेळाव्यातून स्वयंसेवक यांच्या मदतीने कृतीयुक्त साहित्याचे स्टॉल लावण्यात आले . पाल्याना रिपोर्ट कार्ड वाटप करण्यात आले विध्यार्थांना व पालकांना कु. पाल मॅडम यांनी मार्गदर्शन केले व साहित्य वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बारापात्रे सर यांनी केले. मा. श्री. सुपारे सर केंद्रप्रमुख यांनी मेळाव्या निमित्य मार्गदर्शन केले व सुभेच्छा दिल्या. कार्यकमाचे अध्यक्ष मा. श्री.जयंतराव कातरकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती येरला यांनी मेळाव्या निमित्य सांगितले की आपण सर्व पालकांनी शाळेला नियमित सहकार्य केले पाहीजे . व आपल्या पाल्यांच्या अभ्यासाकडे लक्ष दिले पाहीजे . असे सांगीतले उपस्थितांचे आभार श्री . पेंदोर सर यांनी मानले . कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती येरला , पालकवर्ग , सर्व माता व विघ्यार्थांचे सहकार्य लाभले.
