

प्रतिनिधी:रामभाऊ भोयर
नागपूर ते चंद्रपूर हायवे रोड वरील शेडगाव चौरस्ता आजदा फाटया दरम्यान खोल खड्डे पडल्याने रविवारी 11 जुलै रोजी रात्री 9.30 वाजतापासू दोन तास आमदार समीर कुणावार यांनी गाडी थांबून पाहणी केली. या मार्गांवर पडलेल्या खोल खड्ड्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आदेश नॅशनल हायवे रोड चे अधिकारी यांना फोण द्वारे सुचविले त्यांना 12 तासाची सवलत दिली असून 12 तासाच्या आत जर त्या रोडची दुरुस्ती केली नाही तर समोर कारवाई करण्यात येईल अशी सूचना नॅशनल हायवे अधिकाऱ्यांना आमदार समीर कुणावर यांनी दिली.
सोबतच आमदार समीर कुणावार यांनी नॅशनल हायवे चे अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्षात बोलावून घेतले होते यावेळी जाम पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक यांची उपस्थिती होती. यावेळी रस्त्यावरील खड्डे तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश आमदार समीर कुणावार यांनी नॅशनल हायवेच्या अधिकायांना दिले.
