
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव शहरातील वडकी कडून येणाऱ्या भरधाव इंडिगो कारणे रस्त्याच्या फुटपाथवर बसलेल्या दोन युवकांना चिरडले यात दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला ही घटना 6 तारीख गुरुवारला रात्री दहा दरम्यान घडली कार चालक कुणाल नाखले याला पोलिसांनी अटक केली आहे मृतक प्रवीण बन्सोड 41 व दिनेश निकोडे 45 हे नेहमीप्रमाणे जेवण झाल्यावरती शतपावली करिता निघाले होते शतपावली नंतर ते कळंब वडकी हायवेवर विश्रामगृह चे बाजूला फुटपाथवर बसले होते रात्री दहाची वेळ कुणाल नाखले हा इंडिगो गाडी क्रमांक Mh 34 AA7848 या गाडीने वडकीकडून येत होता गाडी भरधाव होती गाडीने दोघांनाही जबर धडक दिली यात दोघेही जागीच ठार झाले त्याआधी त्याने रस्त्यावर एका दुचाकी चालकाला व एका पायी चालत असलेल्या नगरिकालाही उडविल्याचे समजते पण त्यांना गंभीर दुखापत नव्हती कारचालक कुणाल नाखले याला अटक करण्यात आली असून विविध कलमानव्ये त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
