
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यात सततचे दोन वर्षांपासून करोनाने या रोगामुळे लोकांचे रोजगार गेले मंजुरी सुद्धा नवती अशातच शेतीची मशागत करन्याचा हंगाम जवळ येताच शेतकरी यांनी आपले घरचे सोने, चांदी,इतर वस्तू गहाण करून आपली शेती उभी केली राळेगाव तालुक्यात या वर्षी पावसाने शेतकरी यांना साथ दिली पण परतिचा पावसाने मात्र शेतकरी यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले यात सोयाबीन हे पिक तर अख् पान्यात बुडून त्याला कोंब फुटले तर पराटी या पिकांचे बोंडे सडले आहे त्यामुळे शेतकरी हा आर्थिक संकटात सापडला आहे काही शेतकरी यांनी सावकाराकडून पैसे घेऊन शेती उभी केली आहे या नुकसानामुळे कर्ज कसे फेडनार या चिंतेने शेतकरी भयभीत झाला आहे अशातच राळेगाव तालुक्यात खेडा खरेदी ला सुरवात झाली आहे या लोकाकडे कोणत्याही प्रकारचे लायसन्स नाही आहे तरी दिनधाड्या कापसाची खरेदी करताना दिसत आहे. यांचे वजन काटे सुद्धा पासिंग नाही आहे त्यामुळे शेतकरी यांचे अतोनात नुकसान होत आहे विशेष म्हणजे शेतकरी यांना विविध प्रकारचे आमिश दाखवून दिवसाढवळ्या हि खरेदी चालू आहे यात शेतकरी यांचे कमरडे मोडले जात आहे.या सर्व गोष्टीवर संबंधित अधिकारी यांनी लक्ष केंद्रित करून होनारी खेडा खरेदी थांबविली पाहिजे. खेडा खरेदी बंद न झाल्यास फोटो व नावासहित पुढील बातमी प्रसिद्ध करण्यात येईल.
